महम्मद रफी यांच्या गाण्याची बहारदार मैफल
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी ता. २६ ख्यातनाम सिने पार्श्वगायक महंमद रफी यांच्या जन्मशताब्दी निमित्त समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय आणि महम्मद रफी प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने महंमद रफी यांच्या गाण्यांची बहारदार मैफल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या मैफलीचे मुख्य समन्वयक अरुण दळवी यांनी सर्वांचे स्वागत केले . प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.अहमद मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी अजित मिणेकर व रामदास कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. महमद रफी यांची गाजलेली अनेक गाणी आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे किस्से यांनी ही मैफल संपन्न झाली.
मैफलीचा प्रारंभ सूर्यकांत बागडे यांनी ‘सुखके सब साथी ‘ या भक्तीमय गीताने केला. प्रमोद शिवदास यांनी ‘खुदा भी आसमासे ‘या गीताने मैफलीत रंग भरला. वेगळीच धुंदी आणणार गाणं ‘ एक हसी शाम से’ अभिषेक वाळवेकर यांनी मदभरी आवाजात गायलं. प्रिया मिरजकर यांनी आपल्या गोड आवाजात ‘तेरे बिना जिया जाये ना’ हे गीत सादर करत रसिकांची वाहवा मिळवली. ‘ये रेशमी जुल्फे ‘ हे शाहीर संजय जाधव यांनी गायलेले गीत दाद घेऊन गेले.तसेच अजित भिडे यांचं ‘छलकाये जाम’ ,निवास साळुंखे यांचे ‘ तेरे नाम का दिवाना’सुरेश चौगुले यांचे’ मुझे इश्क है तुम्ही से’, नौशाद जावळे यांचे ‘मुझे दर्दे दिल का ‘किरण कटके यांचे ‘छूले ने दोन नाजूक होटो को ‘, देवदत्त कुंभार यांचे ‘ एहसान तेरा होगा मुझपर ‘या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले .
प्राची करोशी यांनी ‘लग जा गले ‘या गाण्यात एक वेगळीच उंची गाठली. सुनिता कळंत्रे यांच्या ‘ तुने ओ रंगीले कैसा जादू किया ‘हे गीत ठेका धरायला लावणार होते.
केतकी पाटील यांचे ‘बेखुदी मे सनम ‘आणि विश्वनाथ अडसुळे यांच्यासोबत ‘छुप गये सारे नजारे ‘ हे गीत टाळ्या घेऊन गेले. विद्याधर सोनटक्के यांचं ‘ मैं कही कवी ना बन जाऊ’ हे गीत तसेच राजू सुतार यांचे ‘दर्दे दिल दर्दे जिगर ‘ महादेव खंदारे यांचं ‘ आज मौसम बडा ‘विकास चौगुले यांचं’ क्या हुआ तेरा वादा ‘सोबत अनिल अत्तार यांनी ‘हा रुसवा सोड सखे ‘या गीताने मैफलीत मजा आणली. कांचनमाला भाट आणि अवधूत गाडबी यांचं ‘ झिलमिल सितारों का आँगन होगा ‘ या गीताने मधुरता वाढली. अजित मिणेकर यांच्या ‘ गुलाबी आखे जो तेरी देखी ‘ या गाण्याने रसिकांना ठेका धरायला लावला. अरुण दळवी यांचं ‘पुकारता चला हु मैं ‘हे गाणं तसेच फिरोज खैरदी यांच्यासोबत ‘ जानू मेरी जान ‘ या गाण्याने धमाल उडवली.शेवटी सुरज रवंदे यांनी गायलेल्या ‘ चाहूंगा मै तुझे सांज सवेरे ‘या गीताने सगळे हेलावून गेले. या मैफलीचे सूत्रसंचालन अरुण दळवी यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने केले.या मैफलीची ध्वनीयोजना प्रशांत होगाडे ,ऋषी ठाकूरदेसाई ,धनराज पाटील यांनी उत्तमरित्या केलेली होती. तुषार कुडाळकर आणि भाऊसाहेब केटकाळे यांचे यावेळी विशेष सहकार्य लाभले.तीन तास चाललेल्या या मैफलीस प्रा. मिलिंद दांडेकर,सतीश पोतदार, सचिन पाटोळे,शकील मुल्ला, सौदामीनी कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने रसिकांचा प्रतिसाद लाभला.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636