बहुजनांनो संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सज्ज रहा – फिरोज मुल्ला (सर)


पुणे न्यूज एक्सप्रेस :

कोल्हापूर.. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व संघर्षनायक मिडियाच्या वतीने जयंतीच्या पुर्व संधेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोठ्या प्रमाणात राजर्षी शाहू महाराज स्मारक येथे साजरी करण्यात आली . अध्यक्षस्थानी रुई ता. हातकणंगले चे माजी सरपंच व पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंगराव कांबळे हे होते .

प्रमुख पाहुणे म्हणून पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला(सर) उपस्थित होते . त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तमाम भारतीय नागरिकांना मंगलमय शुभेच्छा देत ते म्हणाले की जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांची व त्यांनी दिलेल्या संविधानाच्या जागराची जयंती साजरी केली पाहिजे .महापुरुषांना जातीमध्ये घट्ट करून ठेवू नये कारण महापुरुषांनी कधीच जात मानली नाही . त्यांनी जातीच्या पलिकडे जावून मानवता मध्य बिंदू ठेवून मानवादी धर्म कार्य केले . सर्व जातीधर्मातील लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली पाहिजे . कारण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधाना मुळे आपण मनमुकळ्या पणाने भारत देशात वावरू शकतो याच्यात तिळमात्र शंका नाही . परंतु भारत देशात संविधान संपवण्याची भाषा काही संविधान विरोधी जातीयवादी लोक करत आहेत पण कोणाचा बाप संविधान संपवू शकत नाही . पण आपण गाफील राहता कामा नये संविधानाचे रक्षण करण्याची जवाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांवर आहे हे विसरता कामा नये असे .

Advertisement

फिरोज मुल्ला(सर) यांनी बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला समोर मनोगत व्यक्त केले . यावेळी शेतमजुरांचे नेते सुरेश सासने , रुई गावचे पहिले सरपंच विष्णुपंत तराळ (कुरुंदवाड ) , जेष्ट धम्म प्रचारक काका कुरणे , जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय कुमार काश्मिरे , आरपीआय आठवले जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ , पत्रकार चंद्रकांत भाट , बाळासाहेब कांबळे , पापालाल सनदी , प्रविण पवार , नितिन धनवडे ,शरद वाघवेकर , संभाजी चौगुले , राजेंद्र होळकर सिद्धार्थ तायडे (बुलढाणा ) तसेच ॲड महेश कांबळे , ॲड अरविंद पाटील, ॲड . ममतेश आवळे , ॲड . प्रमोद दाभाडे , ॲड . भिमसेन कांबळे, ॲड . प्रशांत कांबळे , ॲड . सादीक भोरे , ॲड . कोमल माने , ॲड . अमोल आवळे , ॲड . सिद्धांत कांबळे , ॲड .पुजा कांबळे, आदिच्या सह
आंबेडकरी चळवळीतील भिमसैनीकांचा, मान्यवरांचा अत्मसन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

यावेळी गरीब सेनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . विचारपिठावर ज्येष्ट पँथर डि. एस डोणे , राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महामंत्री बाबा नदाफ ,महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजुर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सासने ‘सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता इंजि . महादेव कमलाकर , माजी समाज कल्यान सभापती शामराव गायकवाड ,ॲड राहुलराज कांबळे , दिगंबर सकट , सौ पुजा मोरे आदी उपस्थित होते

प्रारंभी स्वागत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (एकतावादी )
पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे बेलेकर यांनी केले प्रास्ताविक पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले तर आभार डॉ विक्रम शिंगाडे यांनी मानले .


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page