बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबीर संपन्न…
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत कांबळे
खोतवाडी तालुका हातकणंगले येथे हिंदु ह्रदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त फोटो पुजन, आरोग्य तपासणी शिबिर तसेच नुतन जिल्हा प्रमुख श्री वैभव उगले, श्री संजय चौगुले यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख श्रीमती मंगलाताई मुसळे व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, खोतवाडी यांच्या वतीने संपन्न झाला.
यावेळी दोन्ही जिल्हा प्रमुखांनी येणारा काळ हा जिल्हातिल सच्चा शिवसैनिकचा आणि पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा असेल असा विश्वास व्यक्त केला. या वेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख मंगलाताई चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. केअर हॉस्पिटल, कोरोची यांच्या वतीने आरोग्य शिबीर राबविण्यात आले. यावेळी सोळा आजारा वरती तपासणी व उपचार मोफत करण्यात आले. या शिबीराचा लाभ जवळपास एकशे पन्नास ग्रामस्थांनी घेतला.
यावेळी उपतालुका प्रमुख आण्णा शेट्टी, खोतवाडी ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, इचलकरंजी माझी शहर प्रमुख धनाजी मोरे, महिला आघाडी तालुका प्रमुख शोभा गोरे, कोरोची विभाग प्रमुख शिवाजी भुयेकर,
सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे, नारायण पाटील, सुनील पाटोळे, दत्तात्रय पवार, प्रविण भोसले, संदिप वेगळे, हसिना शेडबाळे, शोभा रेडेकर, सत्यभामा पाटोळे, सविता पवार तसेच भागातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप तालुका प्रमुख प्रमोद परीट यांनी केले तर आभार युवासेना संघटक रतन वाझे यांनी मानले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636