इचलकरंजी महानगरपालिकेच्या हरित इचलकरंजी निरोगी इचलकरंजी या अभियानास बॅंक ऑफ बडोदा चे सहकार्य
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी : शासनाच्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करणेत येते. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी’हरित इचलकरंजी निरोगी इचलकरंजी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. याकरिता शहरातील विविध घटकांचे सहकार्य घेणेत येणार आहे.
महानगरपालिकेच्या या उपक्रमास
शहरातील बॅंक ऑफ बडोदा या बॅंकेकडुन विविध प्रकारची २०० रोपे देऊन आपला सहभाग घेतला. सदर रोपे महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळांच्या आवारात लावणेत येणार आहेत.
या उपक्रमाचा शुभारंभ दि.१५ डिसेंबर रोजी महानगरपालिका शाळा क्रमांक ५४ कै. वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा येथे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते २० रोपांचे वृक्षारोपण करून करणेत आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.
यावेळी प्र.प्रशासन अधिकारी इरफान पटेल, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, शिक्षण पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांचेसह शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक, विद्यार्थी आणि बॅंक ऑफ बडोदाचे चीफ मॅनेजर अविनाश मुळीक, रिजनल ऑफीसर राहुल गायकवाड आदींसह बॅंकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636