बँकांनी जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे मार्गी लावून नवउद्योजक तयार करावेत – जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार


पूणे न्यूज एक्सप्रेस :

कोल्हापूर : (जिमाका) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून विविध शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यासाठी बँकर्सकरता एक दिवसीय कार्यशाळा महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला. जिल्ह्यात बँकेद्वारे विविध शासन पुरस्कृत योजना राबविल्या जात आहेत. कार्यशाळा ही सर्व बँकाचे जिल्हा समन्वयक आणि कर्ज प्रक्रिया केंद्र यांचे अधिकारी यांच्यासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लाभार्थी यांना विविध शासकीय योजनामध्ये सामावून घेण्याबाबत बँकर्सना सूचना दिल्या. कार्यशाळा घेण्याचा हेतु असा की विविध शासन पुरस्कृत योजना समजून घेऊन ते लाभार्थी पर्यन्त पोहचवणे आणि प्रलंबित प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय घेऊन मंजूर करण्यात यावेत.
“बँकानी कर्ज देताना एक प्रस्ताव म्हणून नाही तर एका कुटुंबाला कर्ज देत आहे असा दुष्टीकोण ठेऊन जास्तीत जास्त नव उद्योजक तयार करावेत. येत्या दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर बँकांनी जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करावा जेणेकरून नवीन व्यवसाय किंवा आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होईल अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व बँकांना दिल्या.

यावेळी बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक विशालकुमार सिंह, यूनियन बँक ऑफ इंडिया चे उपविभागीय व्यवस्थापक गुरप्रीतसिंह, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी जोंजाळ, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक श्री. उपाध्ये, यांच्यासह शासकीय विभागाचे अधिकारी, विविध महामंडळाचे अधिकारी, बँकाचे जिल्हा समन्वयक आणि बँक कर्ज प्रक्रिया केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.विशालकुमार सिंह, बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना विविध शासन पुरस्कृत योजनांची सुरू करण्यामागचा उद्देश असा की छोटे उद्योगाना चालना मिळावी. ज्या छोट्या व्यवसायिकधारांकडे बँकेकडून कर्ज घेताना सुरक्षा ठेवी किंवा तारण ठेवण्यासाठी काहीही नसते अशासाठी विविध शासन पुरस्कृत योजना राबवले जातात .श्री. विशालसिंह पुढे म्हणाले की या योजनेमध्ये अनुदान दिले जाते व या संधीचा बँकेने फायदा व्यवसाय म्हणून घ्यावा.

Advertisement

शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत देण्यात येणारे कर्ज हे एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी मदत करते त्यामुळे या अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांचा सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोनाने विचार करून जास्तीत जास्त कर्ज प्रकरणी मंजूर करावीत असे युनियन बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक गुरप्रीत सिंग यांनी सांगितले.
अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्री. गोडसे यांनी सांगितले की सर्व बँक अधिकारी यांना एका छताखाली सर्व शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. सर्व बँकांना याचा लाभ होईल व सर्व योजनांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची अव्वल कामगिरी कायम राखण्यास मदत होईल अशी खात्री व्यक्त केली. तसेच श्री. गोडसे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर “जनसुरक्षा मोहीम” राबविण्यात येत आहे व या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सामावून घ्या असे आवाहन बँक अधिकारी याना केले.

जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर श्री. अजय पाटील यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती बँक अधिकारी यांना दिल्या. यावेळी श्री. पाटील यांनी या योजनेचा आढावा घेतला व सांगितले की कोल्हापूर जिल्हात या योजेनेमध्ये निराशाजनक कामगिरी असून प्रलंबित प्रस्तावावर योग्य निर्णय घेऊन लवकरात लवकर प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत. जिल्हयाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकर्सना सकारत्मक दुष्टिकोण ठेऊन कर्ज मंजूर करण्याचे आवाहन केले.

नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री जाधव यांनी “घर घर केसीसी” अभियानाबाबत माहिती बँकर्सना सागितली. पुढे श्री जाधव यांनी सांगितले की पीक कर्जा पासून वंचित असलेले व पीएम किसान सन्मान योजने मध्ये लाभ घेणारे शेतकरी, अशा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सामावून घेण्यात यावे. तसेच ही मोहीम दि. 01.10.2023 ते 31.12.2023 पर्यंत राबावली जाणार असून या मध्ये सर्व शासकीय विभाग, नाबार्ड व सर्व बँकेने एकत्र येऊन समन्वयाने काम करण्यांत यावे.

यावेळी लीड बँक, नाबार्ड, जिल्हा उद्योग केंद्र, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या् जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ, ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था,महानगरपालिका विभाग, जिल्हा कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, रेशीम विभागाच्या अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती दिली व बँकर्सना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्याशी संवाद साधले आणि बँकर्सच्या शंकाचे निरसन केले.शासन पुरस्कृत सर्व योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ संबधित सर्व घटकांना दिला जाईल, असे आश्वासन बँकर्सनी दिले.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page