कोरोची येथील जि.प शाळेमधील मुख्याध्यापक भोकरे महिला मदतनीस म्हणतात तू समोरच बसली पाहिजेस
मुख्याध्यापक श्री यशवंत भोकरे सर यांना आपल्या वयाचा विसर पडलेला दिसतो.
विद्यार्थी पालक वर्गातून…..संताप
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोरीची : उत्तम हुजरे
कोरोची— येथील जि प शाळा कन्या विद्यामंदिर मधील मुख्याध्यापक श्री यशवंत भोकरे सर यांनी शाळेमध्ये असलेल्या मुलीच्या वयाच्या मदतनीस यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार नाहक त्रास देत गैर वर्तणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे , या संदर्भात तक्रार साहेब लाल शेख यांनी दिली त्या मुळे सर्वत्र जोरदार खळबळ उडाली आहे अशा प्रकारामुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होऊ लागले आहे अशा मुख्याध्यापकाची तात्काळ निलंबन करून त्याचेवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची जी प शाळेमध्ये मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांची काही महिन्यापूर्वी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे ते पदभार स्वीकारल्यापासून शाळेमध्ये असणाऱ्या मदतनीस यांना परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार कामाच्या बाबतीत नाहक त्रास होत असल्याची तक्रार मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख व ग्रामपंचायत सदस्य संगीता शेट्टी यांना वारंवार दिली होती याची दखल घेत आज ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले व याविषयी हातकलंगले गट शिक्षण अधिकाऱ्यांना तक्रार करणार देणार असल्याचे सांगितले जोपर्यंत मुख्याध्यापक भोकरे यांची निलंबंन होत नाही तोपर्यंत शाळेसमोर उपोषण करण्याचा इशारा साहेबलाल शेख यांनी दिला
याबाबत मदतनीस यांना विचारणा केली असता शाळेतील साफसफाई व इतर कामकाजा व्यतिरिक्त काम न सांगता मुख्याध्यापक भोकरे वारंवार नोकरीवरून काढून देण्याची धमकी देत माझ्या समोरच तुम्ही ऑफिस कार्यालयात बसायचं लज्जा उत्पन्न होईल अशा गलिच्छ शब्दात मुख्याध्यापक भोकरे यांनी मदतणीस यांना वारंवार त्रास दिला आहे अशा मुख्याध्यापकांवर ती योग्य ती कारवाई करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी विद्यार्थी पालक वर्गातून होत आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636