भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांची डॉ पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती
पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारुवाला यांची डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सदस्य म्हणून शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठाच्या अधिनियमानुसार त्यात राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीचा नियामक मंडळात सदस्य म्हणून अंतभाव करण्याची तरतुद करण्यात आली आहे. या तरतुदीला अनुसरुन विद्यापीठ नियामक मंडळावर राज्य शासनाने अली दारुवाला यांची नियुक्ती केली आहे.
डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या कामकाजावर अली दारुवाला हे सरकारच्या वतीने देखरेख करतील. शासन, शैक्षणिक धोरणे आणि धोरणात्मक उपक्रमावर लक्ष केंद्रित करतील. त्यांच्या सहभागामुळे विद्यापीठाचा सार्वजनिक धोरण आणि नियामक चौकटींशी संबंध अधिक दृढ़ होईल अशी अपेक्षा आहे.
डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाने शिक्षण, आर्किटेक्चर, कॉम्स आणि फार्मास्युटिकल सायन्स या सारख्या क्षेत्रांमध्ये विविध नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले आहे. विद्यापीठ दर्जेदार शिक्षणावर भर देते. समर्पित सुविधांद्वारे इनोहेशन आणि संशोधनाला प्राधान्य देते. डॉ. पी ए इनामदार विद्यापीठाच्या वतीने रंगून वाला डेंटल कॉलेज, युनानी कॉलेज आणि हॉस्पिटल व फिजीओथेरपी कॉलेज चालवले जाते. अली दारुवाला हे रुबी हॉल हॉस्पिटलचे सल्लागार म्हणूनही काम करतात. तसेच ते भाजपचे प्रवक्ते असून औऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोऐशनचे प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत. अल्पसंख्याक आयोगाचे ते राष्ट्रीय सल्लागार आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636