रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या शिबिरात वारकरी महिलांची मोफत कर्करोग तपासणी
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट,लायन्स क्लब (सहकारनगर),लायन्स क्लब ऑफ बिबवेवाडी आणि ‘लायन्स राहतेकर वूमन कॅन्सर डायग्नॉस्टिक सेंटर'(एल आर सी सी) यांच्यातर्फे आयोजित शिबिरात स्त्री रोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी महिलांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली.हे शिबीर सोमवार,दि.१ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते ३ यावेळेत माहेश्वरी समाज श्रीराम मंदिर ट्रस्ट ,रविवार पेठ ,कापड गंज येथे आयोजित करण्यात आले होते .
लायन्स क्लबचे पदाधिकारी विजय राठी,महेंद्र ओसवाल ,चंदन मुंदडा,रेणू राठी,मनीषा ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.माहेश्वरी समाज श्रीराम मंदिर ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांचे सहकार्य शिबिराला लाभले.राम बांगड यांनी मार्गदर्शन केले. राम बांगड म्हणाले,’महिलांच्या कर्करोग तपासणीचे असे उपक्रम घेणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर निदान झाल्यास अनेक भगिनींना चांगले जीवन जगता येईल.त्यातून अनेक कुटुंबाना स्वास्थ लाभेल’. ‘महिलांमधील कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने वेळीच तपासणी करून घ्यावी.दर पंधरा दिवसांनी असे तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. महिलांनी उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी’,
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636