ब्रिटिश धार्जिन आरएसएस संघटनेचे सरसंघचालक मोहन भागवत यांना सांगलीत काळे झेंडे दाखवणार – राज्य प्रवक्ते संतोष पाटील.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
दिवंगत प्रमोद महाजन यांचे बंधू स्व. प्रवीण महाजन यांना आरएसएस संघटनेमधील एका प्रमुख पदाधिकाऱ्यानेच पिस्तुंचे लायसन्स मिळवण्यासाठी त्या वेळचे गृहमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांना पत्र दिले होते त्या पिस्तूलच्या द्वारेच प्रवीण महाजन यांचे आरएसएस संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ब्रेन वॉश करून प्रमोद महाजन यांची हत्या करण्यास भाग पाडले.
अयोध्यातील बाबरी मज्जिद उध्वस्त करून गुजरातमध्ये व देशांमध्ये दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र आर एस एस संघटनेतील प्रमुखांनी रचले होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची इच्छा नसताना सुद्धा लोकसभेच्या माध्यमातून स्व. गोपीनाथ मुंडे यांना दिल्लीत पाठवून त्यांची दिल्लीत हत्या करण्याच्या पाठीमागे जी संघटना होती ती संघटना म्हणजेआरएसएस होय. जाती जातीत,धर्मा धर्मात, हिंदू मुस्लिम समाजात फुट पाडून दंगल घडवणारे हीच ती आर एस एस संघटना होय. नागपूर मध्ये एका लग्न कार्यासाठी आलेले जस्टीस लोहिया यांच्या हत्या करण्याच्या कट ज्या रेशीम बाग नागपूर हेडकॉटर मधून रचला गेला ती संघटना म्हणजे आरएसएस होय.
देशांमध्ये काही ठिकाणी घडवलेल्या दंगली, बॉम्बस्फोट हल्ले,पुलवामा हल्ला, हे सर्व कांड करण्याच्या पाठीमागे जी संघटना आहे ती म्हणजेचआरएसएस संघटना होय.भारताचे संविधान, भारताचा तिरंगा झेंडा, भारताचे राष्ट्रगीत हे ज्यांना मान्य नाहीत व ते बदलण्याचे ज्यांचे षडयंत्र चालू आहे ती संघटना म्हणजेच आरएसएस संघटना होय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सादर केलेले संविधान दिनाची तारीख म्हणजे 26/11 हा दिवस होय. या दिवसाचा जनतेला विसर पडावा व एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याकडे असणारी बॉम्बस्फोटाविषयी गुप्त माहिती बाहेर येऊ नये व त्यांना ठार करणे हाच 26/11 चा दहशतवादी मुंबईवर हल्ला हा हल्ला ज्यांच्या प्रेरणेने झाला ती संघटना म्हणजे आरएसएस संघटना होय अशा या देशासाठी घातक घटना घडवणाऱ्या व अनेक छुपा अजेंडा राबवणाऱ्या संघटनेचे नाव म्हणजे आरएसएस संघटना होय
अशा या ब्रिटिश धार्जिन,वैदिक विचाराची, व सनातानी कर्मट आयडॉलॉजीची संघटना म्हणजेच आरसीएस होय. अशा या संघटनेचे प्रमुख सरसंघचालक माननीय डॉ.मोहन भागवत हे सांगलीत येणार आहेत.आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून आपल्या संघटनेत काय चालते याचा जाब विचारू. अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636