सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांची कोट्यावधींची फसवणूक
पुणे न्यूज एक्सप्रेस :
सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या पैशाची काही सैनिकांनी एका कंपनीकडे गुंतवणूक केली.तुम्ही लावलेल्या पैशाचा पाच टक्के परतावा देतो असे बोलून सुरेश गाडीवाट्टार पूर्वसैनिक व त्याच्यासोबत काम करणारे स्टाफ फरारी झाली आहे. खोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या बाबतचा गुन्हा मुंडवा पोलीस ठाणे येथे दाखल झाले आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 0325/2024
मुंढवा पोलीस ठाणे .
निवृत्त झालेल्या सैनिकांनी 22 जुलै 2024 रोजी प्रथम माहिती मुंढवा पोलीस ठाणे येथे दिली होती. 9 दिवस उलटल्यानंतर मुंडवा पोलीस ठाणे यांनी 3 ऑगस्ट 2024 रोजी अधिकृत गुन्हा रजिस्टर केला. दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सदरची केस पुणे आयुक्त कार्यालय आर्थिक गुन्हा शाखा कडे वर्ग केल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हा रजिस्टर करण्यासाठी व आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यासाठी 20 दिवस एवढा उशीर पोलिसांनी का लावला हा प्रश्न निर्माण होतो..?
एकूण 313 लोकांनी आज रोजी पर्यंत अर्ज दाखल केले आहे 30 कोटी रुपये पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा सध्या तरी दिसून येतो. अनेक लोकांनी आतापर्यंत पोलीस ठाणे येथे तक्रार दिली नसल्याची खात्रीलायक माहिती आहे त्या सर्वांची तक्रार झाल्यानंतर कदाचित हा घोटाळा याहीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे कारण सुरेश गाडीवट्टार या आरोपीचा अहमदनगर जिल्हा, नाशिक, कोल्हापूर व अन्य ठिकाणी ऑफिस होते. कदाचित याही ठिकाणी त्यांनी लोकांची फसवणूक केली असेल.
पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्यास याहून अधिक जास्त आर्थिक घोटाळा समोर येऊ शकतो.आरोपी सुरेश गाडीवट्टार व त्यांच्यासोबत काम करणारे स्टाफ यांना त्वरित अटक करावा व या गुन्ह्यात आणखीन किती लोक सामील आहे याचाही तपास होणे गरजेचे आहे.
आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर लढणारे आपल्या प्राणाची आहुती देणारे सैनिकाची फसवणूक होत असेल तर ही बाब आमच्यासाठी खूप शरमेची आहे. पुणे पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी का विलंब केले आहे ही बाब जनतेसमोर येणे खूप गरजेचे आहे. याबाबत लवकरच एक शिष्टमंडळ पुणे पोलीस आयुक्तांना एडवोकेट असीम सरोदे सोबत भेटणार असल्याची माहिती सदर केसचा पाठपुरावा करणारे अंजुम इनामदार यांनी दिली
अधिक माहितीसाठी संपर्क करा
अंजूम इनामदार
अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच
9028402814
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636