कॉलेज मित्र प्रर्यटनाला गेले आणि दोघांच्या जिवावर बेतले .


रेस्क्यु फोर्सच्या मदतीने वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.

पुणे न्यूज एक्सप्रेस :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर – राधानगरी परिसरात असलेल्या काळम्मावाडी धरण पहाण्यासाठी आज सोमवार दि.01/07/2024 रोजी दुपारच्या सुमारास निपाणी येथे रहात असलेले दोघे जण वाहून गेले.ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे.यात गणेश चंद्रकांत कदम (वय 18.रा.आंदोलननगर ,निपाणी ) आणि खाजगी गाडीचा ड्रायव्हर प्रतिक पाटील (वय 22.रा.निपाणी) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.ही माहिती समजताच राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे हे आपल्या कर्मचारी यांच्यासह घटना स्थळी दाखल झाले असून ते रेस्क्यु फोर्सच्या मदतीने वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.

अधिक माहिती अशी की ,निपाणी येथे रहात असलेले कॉलेज मित्र एकत्र येऊन त्यांनी काळम्मावाडी धरण पहाण्याचा बेत आखला आणि तेथील खाजगी गाडी करून काळम्मावाडी धरण क्षेत्रात पोहचले त्या वेळी या धरण क्षेत्रात गणेश हा पाण्यात पोहण्यासाठी उतरल्याचे समजते.त्याला पोहायला येत नसतानाही तो पाण्यात उतरल्याने गणेश वाहून जाऊ लागला त्याला वाचविण्यासाठी प्रतिक पाटील यांनी गणेशला वाचविण्याच्या प्रयत्नात ते ही वाहून गेले.

Advertisement

पुण्यानंतर आता कोल्हापुर जिल्हयात ही दुर्दैवी घटना घडली आहे.या दोघांच्या मृत्यु मुळे निपाणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पावसाळी प्रर्यटनासाठी निपाणी येथुन 12 वीत शिकत असलेले कॉलेज मित्र 13 जण गेले होते. गणेशला या पाण्यात पोहण्याचा मोह त्याला आवरला नाही.त्याला पोहता येत नाही हे माहित असूनही पाण्यात उतरला होता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडत असताना गाडीच्या ड्रायव्हरने वाचविण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो ही वाहून गेला.

घटना स्थळी राधानगरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड,कॉ.भैरवनाथ पाटील,रघुनाथ पोवार ,बचाव कार्यातील जयसिंग किरुळकर ,धोंडीराम राणे हे नदी पात्रात उतरुन शोध घेत आहेत.पाऊस जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढ़त असल्याने बचाव पथकास अडथळा निर्माण होत आहे.अद्याप दोघांचे मृतदेह हाती न लागल्याने शोध कार्य चालू आहे.घटना स्थळी बघ्याची गर्दी झाली आहे.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page