आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी तातडीने रात्री १० वाजता पंचगंगा नदी पुर परिस्थितीची पाहणी केली
Commissioner and Administrator Omprakash Divte immediately inspected the Panchganga river flood situation at 10 pm
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी : दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. रविवार दि.२१ जूलै रोजी रात्री ९ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ६१.०७ फूट इतकी झालेने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी तातडीने रात्री १० वाजता पंचगंगा नदी पुर परिस्थितीची पाहणी करून त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
तसेच सर्व विभाग प्रमुख आणि आपत्ती व्यवस्थापन संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सतर्क रहाणेचे आदेश दिले आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636