भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या ‘मंथन’ ला कॉपीराईट प्रमाणपत्र
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या ‘मंथन क्लायंट कॉऊन्सिलिंग कॉम्पिटिशन’ ला कॉपीराईट प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.एएम लीगल असोसिएट्सच्या ट्रेडमार्क ,कॉपीराईट विभागाच्या प्रमुख डॉ.सेल्विन डिकॉस्टा यांनी हे प्रमाणपत्र भारती विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे यांना प्रदान केले.
मंथन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी हे प्रमाणपत्र सादर करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य डॉ.ज्योती धर्म,डॉ.रोहित सुरवसे,मयुरा पवार,आकांक्षा घाटोळ हे उपस्थित होते.हा कार्यक्रम न्यू लॉ कॉलेज एरंडवणे येथे नुकताच पार पडला.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636