विषारी औषध घेतलेल्या तरुणाचा मृत्यु.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – शाहुवाडी तालुक्यातील थेरगांव येथील संगम विकास यादव (वय 22) याने मंगळवार (दि.17) रोजी रात्री एकच्या सुमारास रहात्या घरात ग्रामोझोन नावाचे औषध सेवन केल्याने त्यांना त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे त्याच्यावर उपचार चालू असताना शुक्रवार दि.20 रोजी दुपारी चारच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
Advertisement
अधिक माहिती अशी की ,यातील मयत संगम याचे वडील आणि मोठा भाऊ शेती करीत असून संगम हा गावात जेसीबी ऑपरेटर म्हणुन काम करीत होता.त्याच्या पश्च्यात आई वडील आणि एक भाऊ आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636