दैनिक सकाळचे पत्रकाराला झालेल्या मारहाण प्रकरणी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दसरा चौकात निदर्शने
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – मुरगुड येथे दै.सकाळचे पत्रकार यांना मारहाण केल्या प्रकरणी मुरगुडचे मा.नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या विरोधात कोल्हापूर प्रेस क्लब आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दसरा चौकात जोरदार निदर्शने करून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या .
या वेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांनी राजेखान जमादार यांना लवकरात लवकर अटक करून पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केली.तसेच पक्षानेही त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करून मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनाही निवेदन पाठवून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या वेळी विविध पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त करीत याचा निषेध केला.
या वेळी कोल्हापूर प्रेस क्लबचेचे अध्यक्ष शितल धनवडे ,कार्याध्यक्ष श्री.दिलीप भिसे यांच्यासह प्रेस क्लबचे पदाधिकारी प्रिंट मिडीया ,छायाचित्रकार ,इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकार ऊपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636