रस्सीखेच व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे: अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रस्सीखेच व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ आज ,२२ डिसेंबर रोजी सकाळी पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहसचिव सौ. मीनाक्षी राऊत या उपस्थित होत्या. प्रशालेचे प्राचार्य राज मुजावर यांनी स्वागत , प्रास्ताविक केले.
विजेत्या खेळाडू व संघांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे व अभ्यासाचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका सौ सना शेख व सौ जुवेरीया इनामदार यांनी केले. आभारप्रदर्शन प्रशालेच्या उपप्राचार्या सौ परवीन शेख यांनी केले.
प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ फरजाना मुजावर व अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या सौ रोशन आरा शेख याही कार्यक्रमास उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मजिद सर,खालिद सर,अमजद सर,जावेद सर यांनी विशेष परिश्रम घेतले.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.ए. इनामदार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636