प्रबोधन वाचनालयात दिवाळी अंक योजना सुरू
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी ता.५ बत्तीस हजारांहून अधिक ग्रंथसंग्रह व शंभरावर नियतकालिकांनी समृद्ध असलेल्या समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘ दिवाळी अंक २०२४’ ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Advertisement
या योजनेमध्ये रसिक वाचकांना अनेक उत्तमोत्तम दिवाळी अंक उपलब्ध करून दिले गेले आहेत. या योजनेचा प्रारंभ अजितमामा जाधव ,अर्चना दातार रेखा सौंदत्तीकर,मनोहर कांबळे अजित शेडबाळे ,मल्लिकार्जुन तेग्गी, अल्लाबक्ष मुजावर ,जगन्नाथ पोवार ,प्रल्हाद मेटे , महमद शेडबाळे,उमेश शिंदे आदींसह अनेकांनी सभासदत्व स्वीकारून केला आहे.तरी इचलकरंजी व परिसरातील साहित्य रसिक व वाचकानी या योजनेचे सभासदत्व स्वीकारून लाभ घ्यावा. त्यासाठी प्रबोधन वाचनालय द्वारा समाजवादी प्रबोधिनी,५३६/१८ इंडस्ट्रियल इस्टेट, राजर्षी शाहू पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636