प्रशासकीय अधिकाऱ्यांना अजून किती जीव गेल्यावर जाग येणार आहे ठाऊक नाही ?
पुणे न्यूज एक्सप्रेस :
माझ्या भागातील हा ऐतिहासिक वारसा लाभलेला नानासाहेब पेशवे तलाव कात्रज या ठिकाणी वारंवार आघात निर्माण झाले आहेत तलावामध्ये मागील 2 दिवसापूर्वी १ एक तरुण नजर चुकीने पाण्यात पडून अंदाज न आल्याने त्याचा जीव गेला, दरमहिना ४-५ प्रकार सातत्याने हे घडत आहे,महादेव नगर, शेलार माळा, गुजर निंबाळकर वाडी या कात्रजच्या वाड्या वस्तीमधील लोकांना कात्रज गाव जिथे शालेय मार्गासाठी ह्या पुलावरून मार्ग आहे सातत्याने रहदारी ह्या पुलावरून असते अनेक लहान विद्यार्थी या पुलावरून प्रवास करत आहे .
पावसाळ्यात पाणी दरवर्षी ओव्हरफ्लो होत आत्महत्या तसेच अन्य प्रकारातून तलावामध्ये अपघाताचे प्रमाण खूप आहे . या तलावावरील असणाऱ्या पुलावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी नाही आम्ही अनेक संबंधित व्यक्तींना पुलाच्या बॅरिकेट पासून १५ फूट उंचीची जाळी बसवून द्यावी अशी मागणी केली पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना अजून किती जीव गेल्यावर जाग येणार आहे ठाऊक नाही ?
आशिष भोसले
सदस्य, स्वराज्य पक्ष
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636