शालेय पोषण आहार बचत गटांकडून ‘आप’ला देणगी; लढा यशस्वी केल्याबद्दल संदीप देसाईंचा सत्कार 


पुणे न्यूज एक्सप्रेस :

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहार पुरवणाऱ्या बचत गटांतर्फे आप पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला. सेंट्रल किचन पद्धतीमुळे छोट्या बचत गटांचे काम जाणार होते. आप ने याविरोधात चार वर्षे सातत्याने दिलेल्या लढ्यास यश येऊन 34 बचत गटांना पोषण आहाराचे काम मिळाले.

हा लढा यशस्वी केल्याबद्दल महिला बचत गटांकडून आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.

सर्वासामान्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेला बळ मिळावे या भूमिकेतून आप ला देणगी म्हणून एकवीस हजार रुपयांचा निधी पक्षाकडे सुपूर्द केल्याचे बचत गटाच्या अश्विनी साळोखे यांनी सांगितले.

Advertisement

अभ्यासपूर्ण मांडणी आणि एखादा प्रश्न हातात घेतला की तो तडीस न्यायचा अशी कार्यपद्धती जोपसल्याने शहरातील अनेक प्रश्न सोडवण्यात आप यशस्वी ठरत असल्याचे गौरव उद्गार मुळीक यांनी काढले.

या प्रसंगी उषाताई वडर, समीर लतिफ, दुष्यंत माने, आदम शेख, राकेश गायकवाड, संजय नलवडे यांचेही सत्कार करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, मराठा महासंघाचे प्रताप नाईक, महासचिव अभिजित कांबळे, महिला बचत गटाच्या छाया जाधव, स्नेहल रायकर, सुनीता तांदळे, वैशाली सोनवणे, सुरेखा सोनवणे, अशा सोनवणे, जयश्री कदम, सुनीता मोहिते, कल्पना माने, मनीषा बामणे, पल्लवी पंडे आदी उपस्थित होते.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page