बेडकिहाळ येथे डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन यशस्वीपणे पार पडले.
बेडकिहाळ ग्राम पंचायतला दलित संघर्ष समितीच्या सर्व मागण्या अखेर मान्य कराव्या लागल्या.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
बेडकिहाळ प्रतिनिधी : डॉ विक्रम शिंगाडे :
दलित संघर्ष समितीचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली दि-3 रोजी बेडकिहाळ ग्राम पंचायत समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
बेडकिहाळ गावातील सर्व रस्ते खड्डेमय झाले असुन शाळेच्या लहान लहान मुलांना, वयस्कर व्यक्तींना, वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. डॉ. विक्रम शिंगाडे यांनी रस्ते करा असे निवेदन अनेकदा ग्राम पंचायतला दिले तरी ग्राम पंचायतने मागणी मान्य न करता ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले. बेडकिहाळ मधील ऐतिहासिक दसरा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असणार्या दसरा महोत्सवाला रस्ते खड्डेमय असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होवु शकतात. त्यामुळे दसऱ्याच्या आत सर्व रस्ते करा असी मागणी शिंगाडे यांनी केली होती. तसेच बेडकिहाळ येथील सरकारी शाळेमध्ये फिल्टर वाटर बसवण्यासाठी पैसे मंजूर होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी अजुन मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. शाळेतील मुलांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारी शाळेमध्ये फिल्टर वाटर बसवावे. व सरकारी शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसविण्यात यावे. अशी मागणी केली होती. आंदोलनस्थळी चिकोडीचे तहसिलदार कुलकर्णी साहेब निपाणीचे ए.ओ.चौगुले साहेब यांनी भेट दिली. सर्व मागण्या ऐकुन घेऊन बेडकिहाळ ग्राम पंचायत अध्यक्ष यांना आदेश दिला बेडकिहाळ येथील रस्ते व शाळेतील सर्व काम लवकरात लवकर करन्यात यावे असे आदेश त्यांनी दिले. ग्राम पंचायतने लेखी स्वरूपामध्ये देऊन सर्व मागण्या मान्य केल्या.व उपोषण स्थगित करण्यास सांगितले.
आंदोलनस्थळी मलगौंडा पाटील, अशोक आरगे,संजय पाटील, महावीर पाटील, नाना पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन विचारपुस केली.त्यावेळी ॲड. सुदर्शन तमन्नवर, ॲड. निरजण कांबळे, राजेंद्र फकीरे, माणकापुर ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र कुंभार, नेताजी कांबळे, सखाराम जाधव, संजय घाटगे, प्रशांत जाधव, अशोक यादव, राजु घाटगे, सुर्यवंशी, सुनिल हेगडे, रोहित जाधव,
तसेच गावातील माळकरी मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ विक्रम शिंगाडे यांनी केलेले आंदोलन यशस्वीपणे पार पडुन सर्व मागण्या मान्य करन्यात आल्या.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636