डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वधर्मिय जयंती समितीच्या अध्यक्षपदी जयसिंग कांबळे तर कार्याध्यक्षपदी चंद्रकांत सुर्यवंशी यांची निवड
पुणे न्यूज एक्सप्रेस
कोल्हापुर दि : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वधर्मिय जयंती समितीच्या अध्यक्षपदी रुई गावचे माजी सरपंच व पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते जयसिंगराव कांबळे यांची तर कार्याध्यक्ष पदी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली
शिवाजी पेठ येथील प्रसाद हॉल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वधर्मिय जयंती समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती . अध्यक्षस्थानी ॲड . अनिल भाले होते .
या बैठकीत पुढील कार्यकारणी जाहीर करण्यात आली जयसिंगराव कांबळे (अध्यक्ष ) चद्रकांत सुर्यवंशी (कार्याध्यक्ष ) सतिश भारतवाशी ( उपाध्यक्ष ) संभाजी चौगुले (उपाध्यक्ष ) ॲड . अनिल भाले ( कोषाध्यक्ष ) निवास सुर्यवंशी (सचिव ) तर कार्यकारणी सदस्यपदी ॲड . राहुल सडोलिकर ,’आदिनाथ साठे , अमोल कुरणे , जहागिर आत्तार फिरोज सत्तारमेकर दिलीप कांबळे (रांगोळी ) , बाळासो कांबळे ( इचलकरंजी ), कुमार कांबळे ( रेंदाळ ) दिनकर कांबळे ( हुपरी)बिजली कांबळे आदीची निवड करण्यात आली . स्वागत प्रास्ताविक संतोष आठवले यांनी तर आभार अमोल कुरणे यांनी मानले
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636