डॉक्टर हेलन केलर स्मृति पुरस्कार रीना पाटील यांना प्रधान
दिव्यांगांचा प्रेरणेचा प्रवास पुढे यावा : डॉ. श्रीकांत केळकर
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : आडकर फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘डॉ. हेलन केअर स्मृती पुरस्कार’ दृष्टीहीनतेवर मात करून स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या रीना पाटील यांना ज्येष्ठ नेत्र तज्ञ तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थेल्मॉलॉजीचे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिवंगत दृष्टिहीन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे वितरण गुरुवारी (दि. २७) सकाळी अकरा वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झाले. नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंडचे राष्ट्रीय सल्लागार दिलीप शेलवंते , सौ. मैथिली आडकर , सौ. अरुणा केळकर उपस्थित होते. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. निरुपमा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या विषयावर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, यात श्रीनिवास शारंगपाणी, वासंती वैद्य, राजश्री लेले, स्वप्निल पोरे, सौदामिनी साने आदींचा सहभाग होता.
डॉ. श्रीकांत केळकर म्हणाले,’ प्रेरणादायी व्यक्तीचा प्रवास सर्वांपर्यंत आणण्याचे काम प्रेरणादायी आहे.आडकर फाऊंडेशनचे हे काम प्रोत्साहनात्मक आहे. संकटांना घाबरता पुढे जात राहिले पाहिजे. दृष्टीहीन व्यक्तींना समाजाने साथ देत राहिले पाहिजे. प्रेरणेचा प्रवास सातत्याने प्रगतीकडे जात राहिला पाहिजे.
मनोगत व्यक्त करताना रिना पाटील म्हणाल्या, ‘ दृष्टीहीन व्यक्तींनी सहानुभूती मिळवत बसू नये. डोळे नाहित तरी इतर अवयव कार्यरत आहेत , या जिद्दीने काम करावे. समाजाने देखील इतर व्यक्तींप्रमाणे दृष्टीहीन , दिव्यांग व्यक्तींना वागवले पाहिजे . मनातील दुःख बाजूला ठेऊन हसऱ्या चेहऱ्याने वावरले पाहिजे’.
दिलीप शिलवंते म्हणाले , ‘ हष्टीहीन व्यक्तींसाठी समाधानकारक असले तरी पुरेसे नाही, हे काम वाढले पाहिजे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636