डॉक्टर प्रतिभा राजन बागवे या आयुष्य ग्लोबल अवॉर्डने सन्मानित .
साई योगी गगनगिरी नेचर क्युअर फाउंडेशन च्या संचालिका डॉक्टर प्रतिभा राजन बागवे यांना 1993 ते 2023 अशी गेली तीस वर्ष सातत्याने आयुष चिकित्सेसाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रात 108 फ्री मेडिकल कॅम्प वर्कशॉप तसेच आकाशवाणी दूरदर्शन व विविध चॅनेलवर मुलाखती भाषणे व प्रिंट मीडियामध्ये विविध अंगी लेखमाला व यातून मार्ग काय ?
यासारखे सदरातून निसर्गोपचार, योगा व ऍडव्हान्स लेझर ॲक्युपंक्चर इ. प्रचार व प्रसार करीत आहेत. “अस्वास्थ्यातून स्वास्थ्याकडे” या उपक्रमातून प्रबोधनाचे कार्य करत आहेत. निस्वार्थ ,प्रेरणादायी व समर्पण वृत्तीने हे कार्य केल्याबद्दल 29 ऑक्टोबरला शिर्डी येथे समारंभ पूर्वक सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे व सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याबद्दल सर्व स्तरातून सामाजिक संस्थांतून त्यांना अभिनंदन त्यांचे अभिनंदन होत आहे. आईमा आयुष्य इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ग्लोबल मेडिकल असोसिएशन व एम एस एम एस मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार डॉक्टर प्रतिभा राजन बागवे यांना प्रदान करण्यात आला.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636