डॉ विक्रम शिंगाडे यांना दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
पुणे न्यूज एक्सप्रेस :
डॉ विक्रम शिंगाडे यांना आत्मश्री प्रतिष्ठान नवी दिल्ली यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय समाजभूषण गोल्ड स्टार अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ विक्रम शिंगाडे हे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. अनेक सामाजिक उपक्रम अनेक वर्षांपासून राबवत आहेत. त्यांना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना चेन्नई युनिव्हर्सिटी कडुन सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवीने देखील सन्मानित करण्यात आले आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना आत्मश्री प्रतिष्ठान नवी दिल्ली यांच्या वतीने दि- 6 डिसेंबर रोजी दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली येथे डॉ विक्रम शिंगाडे यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, मेडल, शाल,श्रीफळ व मानधन देऊन सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी श्री डी.व्ही.सदानंदगौड मा. मुख्यमंत्री कर्नाटक सरकार, मा.केंद्र सचिव, शोभा करंदाजी क्रुषी, शेतकरी कल्याण राज्य सचिव,मा सचिव कर्नाटक सरकार, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सी सोमशेखर आय.ए.एस.अधिकारी बेंगळुरू, वेंकटाचल हेगडे, आंतरराष्ट्रीय न्यायशात्र विभाग जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली असे अनेक दिग्गज मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636