मौलाना आझाद महाविद्यालय येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्र समन्वयक पदी डॉ. सोहेल झकीउद्दीन यांची नियुक्ती
पुणे न्यूज एक्सप्रेस :
छत्रपती संभाजीनगर :
मौलाना आझाद शिक्षण संस्था संचलित मौलाना आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रोजा बाग छत्रपती संभाजी नगर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ संचलित अभ्यास केंद्र अस्तित्वात आहे. दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मजहर अहेमद फारुकी यांनी अभ्यास केंद्र समन्वयक म्हणून डॉ. सोहेल जकीउद्दीन सहाय्यक प्राध्यापक, यांची नियुक्ती केली आहे.
Advertisement
डॉ. सोहेल जकीउद्दीन यांनी प्राचार्य डॉ. मजहर अहेमद फारुकी आणि डॉ. अथरुद्दीन कादरी यांच्या उपस्थितीत सदरील पदभार स्वीकारला. समन्वयक पदी नियुक्ती झाली म्हणून प्राचार्य डॉ. मजहर अहेमद फारुकी डॉ. आरेफ पठाण उप प्राचार्य, डॉ. अथरुद्दीन कादरी, प्राचार्य प्रा. शेख इमरान रमजान, प्रा. कनिज फातेमा, डॉ. शेख शकील मजीद, डॉ. शेख सुभान हसन, डॉ. सय्यद रिजवानुद्दीन यांनी डॉ. सोहेल जकीउद्दीन यांना शुभेच्छा दिल्या. सदरील अभ्यास केंद्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत जे विविध अभ्यासक्रम चालविले जातात त्यापैकी बी.ए. या अभ्यासक्रमासाठी चे प्रवेश सध्या सुरू आहेत . यूजीसीच्या नवीन नियमानुसार एकच विद्यार्थी नियमित अभ्यासक्रमांसह या अभ्यासक्रमास देखील प्रवेश घेऊ शकतात, व एकाच शैक्षणिक वर्षात दोन पदव्या प्राप्त करू शकतात. सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नसल्याने तसेच दहावी व बारावी नंतर शिक्षण अर्धवट सोडलेल्या व पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र समन्वयक डॉ. सोहेल जकीउद्दीन (९२७०४२३७८६) यांच्याशी संपर्क साधावा.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636