दै.परतगंगा व दै.ग्रामदेवताचे संपादक श्री.सखाराम जाधव यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर -राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो या वर्षीचा 2024 चा राज्यस्तरीय आदर्श संपादक म्हणुन दै.परतगंगा व दै.ग्रामदेवताचे संपादक श्री .सखाराम जाधव यांना जाहीर झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हा वितरण सोहळा कोल्हापुर येथे मान्यवंराच्या उपस्थित होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी माहिती दिली.या वेळी अनिता काळे,रुपाली निकम ,संजय सासने,संभाजी थोरात,शिवाजी चौगुले,महादेव चक्के,भगवान माने आणि श्रीकांत माजगांवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.पुरस्कार प्राप्त पुरस्कारकर्ते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोल्हापूर : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा , महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीकरीता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करणेत आलेले आहेत.
याकरीता सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला – क्रिडा, आरोग्य, पत्रकारीता, उद्योग, कृषी, आरोग्य, शासकिय व निम शासकीय सेवेत वैशिष्ठयपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना समाज भूषण, उत्कृष्ठ प्रशासक, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक / शिक्षिका, कामगार भूषण, आदर्श संस्था, सहकार भूषण, कला भूषण, कला रत्न, उद्योग भूषण, योग रत्न असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा लवकरच राज्यातील महनीय मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आयोजित करणेत येणार असलेचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी अनिता काळे, रूपाली निकम, संजय सासने, संभाजी थोरात, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, भगवान माने, श्रीकांत माजगावकर आदी. पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वच पुरस्कार विजेत्यांवरती समाजातील सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636