विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक कर्मचाऱ्यांना मिळणार चांगल्या दर्जाचे जेवण : डॉ. तुषार निकाळजे यांच्या प्रयत्नांना यश: निवडणूक आयोगाने घेतली दखल…
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुण्यातील नितसूक विषयाचे संशोधक डॉ. तुषार निकाळजे यांनी वर्तमानपत्रे, साप्ताहिके व प्रसार माध्यमे यांमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर लेख लिहून प्रसिद्ध केले होते. वर्ष 1952 ते वर्ष 2024 या कालावधीमध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व अत्यावश्यक गरजांचे नियोजन करण्यात निवडणूक आयोगास अपयश आल्याचे निदर्शनास आणले.
Advertisement
आशियाई देशांच्या निवडणूक फेडरेशनचे अध्यक्षपद असलेला भारत देश व 75 वर्षे लोकशाही जतन करण्याचे काम करणाऱ्या 53 लाख निवडणूक कर्मचाऱ्यांची दोन वेळा चांगले जेवण व एक वेळ नाश्ता, पत्र्याचे मतदान केंद्र, मानधनामध्ये वाढ, मतदानाचा टक्का वाढण्यासाठी उपाय योजना इत्यादी विषयांवर डॉ. निकाळजे यांनी या लेखांमध्ये उल्लेख केला होता. भारतातील 10 लाख 48 हजार मतदान केंद्रांवर निवडणुकीचे काम करणारे 53 लाख 37 हजार कर्मचारी निवडणूक आयोगाचे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी संपूर्ण भारतात जवळपास 3392 कोटी रुपये बचत करीत असतात. पुण्यातील अप्पा बळवंत चौकाशेजारी एका हॉलमध्ये सामान्य जनता व अतिरिक्त निवडणूक आयुक्त यांच्यातील चर्चेच्या वेळी डॉ. निकाळजे यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या व्यथांबद्दल अतिरिक्त निवडणूक आयुक्तांशी चर्चा केली व या सर्व बाबी निदर्शनास आणल्या होत्या .
या संदर्भात डॉ. निकाळजे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली यांना पत्राद्वारे देखील कळविले होते. याची दखल घेऊन यावेळी विधानसभा निवडणुकीच्या वेळी चांगल्या प्रतीचे जेवणासाठी पाच कोटी व ज्यादा कामाचा ताण कमी होण्यासाठी हमाली कामासाठी कंत्राटी पद्धतीने दीड कोटी रुपयांच्या निविदा पुणे जिल्ह्यासाठी मागविल्या आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636