“माझ्या मनातल्या घरातही” आई हे घरात गजबजलेलं गावं असतं !
पुणे – घर हे आई कसं नात्यांच्या वीणीनं घट्ट बांधून ठेवते, त्याला वेळ प्रसंगी भावनांचा रंग चढवते. घरात सुख नांदाव यासाठी “या सुखांनो या” अशी साद आई घालते….मग ती शहरातली असो की गावातली खेड्या मधले घर कौलारू म्हणणारी आई असो. ‘आई म्हणजे नुसतं नाव नसतं / ते घरात गजबजलेलं एक गाव असतं’ ही ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे यांची गाजलेली आणि प्रत्येकाल अंर्तमुख करणारी कविता. या कवितेने भाऊबीजेच्या (बुधवारी) सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात “घर माझ्या मनातलं” अनुभवायला आलेल्या रसिकांचा मनाचा वेध घेतना .प्रत्येकाला आपापल्या घरात गजबजलेल्या आई नावाच्या गावाची आठवण करून दिली, हे रसिकांनी या सुखांनो या या गाण्याला दिलेल्या वन्समोअरमधून स्पष्ट झाले.
निमित्त होतं, रसिकांच्या दिवाळीच्या आनंदात भर टाकण्यासाठी आयोजित केलेल्या घर माझ्या मनातलं या कार्यक्रमाच. घर या विषयावरील कविता, गाणी, नृत्य अशा हा कार्यक्रमाची निर्मिती संवाद पुणे यांनी तर कार्यक्रमचे आयोजन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांनी केले होते. या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांचच्या दीप प्रज्वलन करून तसेच पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी झाडाला रंगमंचावर पाणी देऊन झाली. यावेळी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, त्यांच्या पत्नी चंद्रा सुब्रमण्यम, कंपनीचे व्यवसाय संचालक संजय शर्मा, त्यांच्या पत्नी विजय शर्मा, माजी संचालक राजेश पांडे, डॉ. माधवी वैद्य, माधुरी सहस्त्रबुद्धे, केतकी बोरकर, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला संचालक बागेश्री मंठाळकर, माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, कवयत्री डॉ. माधवी वैद्य, डॉ. अशोक विखे पाटील, कुमार शंकर यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या. आदी मान्यवर उपस्थित होते. संवाद पुणे च्यावतीने कुमार शंकर आणि संजय शर्मा यांचा पुणेरी पगडी देऊन तसेच अन्य मान्यवरांचे स्वागतपर सन्मान करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कुमार शंकर म्हणाले, आपल्याकडे अनेक सण आपण साजरे करतो. हे प्रत्येक सण संस्कृती, नाती, लोककला, खाद्य संस्कृती, संगीत, गायन अशा विविध धाग्यांनी जोडलेले आहेत. सण हे कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजाला एकत्र आणतात. महाराष्ट्रात धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजन म्हणजे पाडवा आणि भाऊबीज असे पाच दिवस विविध रंगात दिवाळी साजरी केली जाते हे प्रथमच अनुभवतो आहोत. म्हणूनच आम्ही घरांना जोडणा-या या दीपोत्सवात घर मनातलं हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत आणि ते किती यथार्य़ आहे रसिकांनी त्यांच्या उपस्थितीने अधोरेखीत केले आहे. राजेश पांडे म्हणाले, सामाजिक भान ठेवून दिवाळीच्या आनंदात समाजाला काही तरी द्यायाला पाहिजे या हेतूने कंपनीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या संहिता लेखन कवयत्री डॉ. माधवी वैद्य यांनी केले होते. या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना सुनील महाजन यांची तर नृत्य दिग्दर्शन व संयोजन निकीता मोघे यांनी केले होते. कार्यक्रमातील निवडक गीतांवर नृत्याविष्कार अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी सादर केले. कार्यक्रमात संदीप उबाळे, योगिता गोडबोले, मनिषा निश्चल यांनी गाणी सादर केली. त्यांना अमृता ठाकूरदेसाई, अनय गाडगीळ, नितीन शिंदे, अपूर्व द्रविड, अभय इंगळे या साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना प्राजक्ता मांडके व अजित सातपुते यांनी कार्यक्रम पुढे नेताना मान्यवर कवींच्या कवितांची पेरणी यात यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरूवात ‘दिस जातीलं दिस येतील दिस येतील, या गाण्याने झाली. त्यानंतर घराबद्दलचं स्वन्प सांगणारं ‘ दो दिवाने शहर में’, या सुखांनो या…’, ‘मेरे घर आयी एक नन्हिं परी’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘खेड्यामधले घर कौलारू ‘, ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’, ‘जे वेड मजला लागले’, तुझ्या गळा माझ्या गळा’, ‘दर्या किनारे एक बंगलो ग पोरी‘,’ घरात हसरे तारे‘, ‘ प्रेम स्वरूप आई’, ‘तुझ्या गळा माझ्या गळी’ , ‘आली हासर पहिली रात’, ‘अरे संसार संसार’, ‘छोटासा घर होगा’, ‘इक घर बनाऊँगा तेरे घरके सामने’, अशी लोकांच्या मनात घर करून असलेली मराठी – हिंदी गाणी सादर कjरून रसिकांना मंत्र मुग्ध करण्यात आले. कार्यक्रमाला एमएनजीएलच्या रसिका ग्राहकांनी वर्ल्ड कपमधील भारताचा सामना सोडून या सूरमयी दीपोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
अधिक महितीसाठी संपर्क –
सुनील महाजन
अध्यक्ष – संवाद पुणे
९३७१०१०४३२
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636