हेर्ले येथे शेतकऱ्याची आत्महत्या .
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – हातकंणगले तालुक्यातील हेर्ले येथे रहात असलेले सिंकदर बाजीराव खतीब (वय 55.) यांनी शुक्रवार दि. 28/06/2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास रहात्या घरात लोंखडी पाइपला दोरीने बांधून गळफास लावलेल्या स्थितीत आढ़ळल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत सिंकदर खतीब हे शेती करत होते.आज सकाळी दहाच्या सुमारास आपल्या खोलीत जाऊन लोंखडी पाइपला गळफास लावलेल्या स्थितीत त्यांच्या पत्नी खोलीत गेल्याने ते लटकलेले पाहुन त्यांच्या पत्नीने आरडा ओरडा करीत बाहेर आल्या त्या वेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचारापूर्वी मृत्यु झाला.त्यांच्या पश्यात पत्नी ,एक मुलगा आणि एक मुलगी आहे.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636