समाजवादी प्रबोधिनीत चित्रपट व संवादाचा कार्यक्रम
पुणे न्यूज एक्सप्रेस
इचलकरंजी ता. १ समाजवादी प्रबोधिनी च्या वतीने ‘हिमोलिंफ’ – इनव्हिजिबल ब्लड, हा चित्रपट आणि संवादाचा कार्यक्रम रविवार ता.३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित केला आहे.या चित्रपटास ११ जुलै २००६च्या मुंबई बॉम्बस्फोटांची पार्श्वभूमी आहे. बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून अब्दुल वाहिद या शिक्षकास अटक करून त्याचा अतिशय छळ केला.
वाहिदने त्याच्यावर होणारे अत्याचार सहन केले. कायद्याचा अभ्यास केला. सनदशीर मार्गाने दीर्घकाळ प्रयत्न केल्यावर अखेर त्याची निर्दोष सुटका झाली. या सत्य घटनेवर आधारित वर त्यानेच “बे गुनाह कैदी” नावाचे पुस्तक लिहितो. या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे.या संवादासाठी पटकथा लेखक आणि दिग्दर्शक सुदर्शन गमरे, पुस्तकाचे लेखक डॉ. अब्दुल वाहिद, कलाकार डॉ.रियाज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेकॉ. सुबोध मोरे उपस्थित राहणार आहेत.सर्वांसाठी विनामूल्य असणाऱ्या या चित्रपट संवादाचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आली आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636