लुगडी ओळ येथे बंद असलेल्या घरास आग.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – महाराणा प्रताप चौक ते लुगडी ओळ परिसरातील बंद असलेल्या दुमजली घरास आग लागून या आगीत घरातील साहित्य जळुन 15 ते 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.हा प्रकार सोमवार (दि.05) रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडला आहे.हा प्रकार आसपासच्या नागरिकांच्या लक्ष्यात येताच त्यांनी अग्निशामन दलाला वर्दी दिली.कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामन दलाचा एक बंब तात्काळ घटना स्थळी जाऊन त्यांनी तळ घरासह वरच्या मजल्यावरील दरवाजे तोडुन आतील आग विझवली.त्या परिसरात एकमेकांना घरे लागून असलेल्या गल्लीत आग लागल्याने भितीचे वातावरण पसरले होते.
संबंधित घर अनुप मनोहर गराडे यांच्या मालकीचे असून गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.अग्निशामक दलाचे जवान दत्तात्रय जाधव,उदय शिंदे,सुरेंद्र जगदाळे आदीच्या सहाय्याने आग विझवली.दक्षता पथकाचे अधिकारी जयवंत खोत यांच्यासह अभय कोळी,प्रविण ब्रम्हदंडे ,उमेश जगताप आणि सौरभ पाटील घटना स्थळी उपस्थित होते.आगीचे कारण समजू शकले नाही.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636