प्रथम वर्ष बी.एड. छात्राध्यापक स्वागत समारंभ तसेच गुणांकन प्राप्त छात्राध्यापक,CTET पास विद्यार्थी व पवित्र पोर्टल मधून सिलेक्ट झालेले विद्यार्थी यांच्यासाठी बक्षीस वितरण”कार्यक्रम संपन्न झाला.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठ वडगाव येथे दि.४ आक्टोंबर,२०२४, शुक्रवार रोजी महाविद्यालयामध्ये “प्रथम वर्ष बी.एड. छात्राध्यापक स्वागत समारंभ व गुणांकन प्राप्त छात्राध्यापक, CTET पास विद्यार्थी व पवित्र पोर्टल मधून सिलेक्ट झालेले विद्यार्थी यांच्यासाठी बक्षीस वितरण”कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.ताज अब्दुल मुल्लानी(कार्यकारी संपादक, बी. न्यूज) तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ.निर्मळे आर. एल.व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका अपर्णा काटकर व सदफ मोमीन यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन व रोपास जलार्पण अशा मंगलमय वातावरणाने झाली.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. शिरतोडे वनिता यांनी केले . पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका अमृता सावंत यांनी करून दिला. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे व अतिथींचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रथम वर्षातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्याचे व्यासपीठावरती स्वागत करण्यात आले. त्यानंतर द्वितिय वर्षातील विद्यार्थ्याचे त्यांनी प्रथम वर्षात प्राप्त केलेल्या गुण क्रमांकानुसार शर्वरी करपे, सुनंदा पोवार, तेजस्विनी मोरे, शिलाताई पाटील, दिपाली परीट, सुप्रिया गिरीगोसावी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शैक्षणिक वर्ष2022 ते 2024 बॅच मधील विद्यापीठ परीक्षेतील गुणांकन प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कुंभार उषादेवी, माने दिव्या, चौगुले अमृता, खाडे तेजस्विनी, पाटील स्नेहल, पाटील सरीता यांचा सत्कार करण्यात आला त्या नंतर CTET पास व पवित्र पोर्टल मध्ये निवड झालेले विद्यार्थी ओंकार नाळे, संतोष डोंगळे, प्राजक्ता कुलकर्णी यांनाही पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी शर्वरी करपे, अक्षय शिपुरे, आयेशा बिजली व सुहास पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .त्यानंतर पवित्र पोर्टल मध्ये निवड झालेले संतोष डोंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या यशाचे श्रेय सर्वस्वी बी. एड्. महाविद्यालयाचे आहे असे सांगितले.त्यानंतर ताज मुल्लानी सरांनी आपले विचार व्यक्त केले,
आपल्या प्रभावी वक्तव्यांने त्यांनी शिक्षक कसा असावा, जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, बी. एड्.अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण कोणती कौशल्ये व कोणते गुण आत्मसात करू शकतो याविषयी खूपच छान मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःचे बी.एड्. महाविद्यालयातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच अब्दुल लाट येथील ज्ञानेश्वर मुळे यांच्या आयुष्यातील सामान्य ते असामान्य बनण्यापर्यंतचा प्रवास या उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. संघर्षाला न डगमगता यशापर्यंत पोहोचण्याची धडपड करणे हे आपले ध्येय असावे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करताना बी.एड्.महाविद्यालय विद्यार्थ्यांना कसे घडवते?, उत्तम शिक्षक कसा तयार होतो?, यासाठी आमचे महाविद्यालय कसा प्रयत्न करते? याविषयी माहिती दिली.बी.एड्. करत असताना कोणत्या पद्धतीने ज्ञान प्राप्त केले पाहिजे व त्याचा उपयोग सध्य परिस्थितीमध्ये व भविष्यात कसा होईल . त्यातून स्व- विकास कसा साधावा याची माहिती दिली व प्रथम वर्ष विध्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपले वक्तव्य पूर्ण केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय विजयसिंह माने साहेब यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले .
त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिला पाटील या विद्यार्थिनीने केले आणि कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636