इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी आणि माजी खासदार स्व.दत्ताजीराव कदम यांना विनम्र अभिवादन
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि.१९ नोव्हेंबर रोजी माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त तसेच माजी खासदार स्व.दत्ताजीराव कदम यांच्या पुण्यतिथी निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. त्याचबरोबर स्व.इंदिरा गांधी यांची जयंती हा दिवस ‘ राष्ट्रीय एकात्मता दिन ‘ म्हणून साजरा होत असलेने यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ उपस्थितांकडून घेणेत आली.
याप्रसंगी विधी अधिकारी खदिजा सनदी, प्रविण बोंगाळे, सदाशिव जाधव,प्रदीप झंबरी, तेजस्विनी सोनवणे, अशोक कमते, आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636