इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरु आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी :
आज मंगळवार दि.१४ नोव्हेंबर रोजी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरु आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी कर अधिकारी स्वप्निल बुचडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव शिंदे, सदा जाधव, सचिन पाटील, दिपक जाधव, अमोल दड्डीकर, अविनाश रंगाटे, संजय ढेंबरे, सचिन व्हलेर , चंद्रकांत साळी आदी कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636