२३ फेब्रुवारी रोजी मोफत वैद्यकीय शिबीर
‘शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन’तर्फे आयोजन
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : ‘शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन’ आणि स.प.महाविद्यालयाच्या संयुक्त विदयमाने दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
स.प.महाविद्यालयातील स्टुडंट्स हॉल येथे हे शिबीर होणार आहे. केसांच्या समस्या,त्वचा विकार,हाडांचा ठिसूळपणा यावर मार्गदर्शन तसेच,मॅग्नेटिक क्वांटम अनॅलिसिस या निदान पद्धतीनुसार तपासणीची व्यवस्था या वैद्यकीय शिबिरात मोफत करण्यात येणार आहे.शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांनी काम केलेल्या ६३ व्या इंजिनिअर रेजिमेंटचे निवृत्त मेजर कुंवरजितसिंग पनेसर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.फाऊंडेशनच्या संस्थापक श्रीमती गीता गोडबोले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636