१४ जुलै रोजी कोथरूड मध्ये गांधी दर्शन शिबीर
Gandhi Darshan Camp in Kothrud on 14th July
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार,दि.१४ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर होणार आहे.डॉ.विश्वंभर चौधरी (लोकसभा निवडणूक प्रचारातील अनुभव),एड.निशा शिवूरकर (महात्मा गांधी आणि स्त्री-पुरुष समानता),डॉ. कुमार सप्तर्षी(महात्मा गांधी आणि तत्कालीन सशस्त्र चळवळ) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या विश्वस्त सिसिलिया कार्व्हालो या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.’गांधी दर्शन’ विषयावरचे हे बारावे शिबीर आहे.
अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रभारी सुदर्शन चखाले( ७८८७६३०६१५),जांबुवंत मनोहर (९०२८६३३७२०),एड.स्वप्नील तोंडे (९९२३५२३२५४) यांच्याशी संपर्क साधता येईल.शिबिरासाठी दोनशे रुपये नोंदणी शुल्क आहे.त्यात शिबिरस्थळी नाश्ता,चहा आणि भोजनाचा समावेश आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636