गणेशोत्सव संपला आता वेध लागले विधानसभा निवडणूकीचे
पुणे न्यूज एक्सप्रेस :
गणेशोत्सव संपला आता वेध लागले विधानसभा निवडणूकीचे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मतदासंघातून इच्छुकांकडून शक्ती प्रदर्शनाची कुठलीही संधी सोडली जात नाही. आता नाही तर कधीच नाही, याप्रमाणे इच्छुक उमेदवार फ्लेक्स, सोशल मीडिया, शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात आहेत. मतदासंघातील वसाहतींमध्ये भेटी गाठीवर भर दिला जात आहे.
Advertisement
एकीकडे उमेदवारीसाठी पक्षाच्या वरिष्ठांकडे जोरदार फिल्डींग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत , दुसरीकडे मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाईल याचीही धड धड वाढू लागली आहे , निवडणुकीचे ठोकताळे आखून त्या-त्या ठिकाणच्या मतदारांना खूष ठेवण्यासाठीचे जोरदार प्रयत्न असणार आहेत तर दुसरीकडे दुरावलेल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे इतर पक्षांतील नाराजांना गळ घालण्याचा प्रयत्न, घरोघरी पोहचण्यासाठीची धडपड त्यातही उमेदवारीसाठी सुरू असलेले पक्षांतर्गत राजकारण अशी कसरत इच्छुकांना करावी लागणार आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636