सलीम बागवान सारख्या वेड्या माणसाला खुलासा देणे म्हणजे मूर्ख पणाच आहे – कुलपती डॉ. पी ए इनामदार.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
फिरोज मुल्ला सर
पुणे : डॉ सलीम बागवान यांनी बोलावलेल्या डॉ पी ए इनामदार यांच्या विरोधातील पत्रकार परिषदे मध्ये त्यांनी जे आरोप केले आहेत त्या संदर्भा मध्ये पुणे न्यूज एक्सप्रेस ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सांगीतले की अशा वेड्या माणसाला खुलासा देणे म्हणजे मूर्ख पणाच आहे .
माझा कारभार हा पूर्णपणे पारदर्शक आहे म्हणून मी मन खुलष्याने सांगत आहे पस्तीस ते चाळीस वर्षां पासून या कारोबाराच्या माध्यमातून जनसेवा करीत आहेत , द मुस्लिम को ऑप बँके मध्ये तीस हजार पेक्षा अधिक सभासद आहेत आणि ते मला लोकशाही पद्धतीने मला निवडून देतात आणि त्यांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे माझा कारभार स्वच्छपणे चालत आहे, त्यापैकी कोणाची शंका माझ्यावर नाही असे आयरे गैरे फालतू माणसं असे बिन बुडाचे आरोप करून स्वतःला मुस्लिम समाजात प्रसिद्धी मिळवून घेण्याची वेडेपण अंगीकृत करण्याचा स्वभाव असतो,
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सुरुवातीला तेथे पंधराशे ते दोन हजार विद्यार्थी तेथे शिक्षण घेत होते पण जेव्हा मी कारोबार हातात घेतला व माझ्या बरोबर काम करणारे माझे सहकारी यांची मला मोलाची साथ मिळाली म्हणून आज त्या ठिकाणी तीस हजार विद्यार्थि उच्च शिक्षण घेत आहेत आणि आझम कॅम्पस मध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थि उच्च शिक्षित होत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि सालाबाद प्रमाणे नियमानुसार लोकशाही मार्गाने मी व माझे सहकारी निवडून येतात , म्हणून माझी कार्यक्षम चेअरमन म्हणून निवड करण्यात येते. आज संपूर्ण भारतामध्ये मुस्लिम को ऑप बँक एक नंबर वर आणून ठेवलेली आहे . अशी महत्वाची माहिती त्यांनी पुणे न्यूज एक्सप्रेसचे विशेष प्रतिनिधी फिरोज मुल्ला सर यांचेशी बोलताना दिली .
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636