कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ २०२३ पुरस्कार सोहळा
पुणे : कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने यंदाचे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, अभिनेते अभिजीत चव्हाण, युवा अभिनेता अमित भानुशाली, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, अभिनेत्री सायली देवधर, अभिनेते सौरभ चौगुले, पत्रकारिता क्षेत्रातील अरुण देविदास मेहेत्रे ( विशेष वरिष्ठ प्रतिनिधी, झी 24 तास), अरुण रमेश सुर्वे (मुख्य उपसंपादक, सकाळ), विजय कुलकर्णी (मुख्य उपसंपादक, राष्ट्रसंचार), आरजे निमी, आरजे सौरभ यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा आज मंगळवार ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती,पुणे येथे सायंकाळी ७ वा. होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक काशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष पुण्याचे पॅड मॅन योगेश पवार हे आहेत. प्रवेश विनामुल्य आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636