इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणावर हातोडा
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी प्रतिनिधी :उमाकांत दाभोळे
इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण होत असले बाबत तक्रारी महानगरपालिकेकडे वारंवार प्राप्त होत आहेत. वाढत्या अतिक्रमणामूळे वाहतूक कोंडी होऊन गर्दीच्या ठिकाणी अपघात होत असलेबाबत देखील निदर्शनास आलेने इचलकरंजी महानगरपालिके मार्फत पोलिस बंदोबस्तात आज गुरुवार दि. ३० मे पासून शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर व रस्त्यालगतच्या फुटपाथवर अतिक्रमण निर्मूलन मोहिम हाती घेणेत आलेली आहे. सदर मोहिमे दरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून विना परवाना विक्री करणारे फेरीवाले. हातगाडीधारक तसेच इतर विक्रेते यांच्यावर कडक कारवाई करणेत येवुन मोहिमे दरम्यान रस्त्यावर बेवारस उभ्या आढळणा-या हातगाड्या जप्त करण्यात आलेली आहेत.
सदर मोहीम राबविण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या निर्देशानुसार उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या आदेशा नुसार शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर आणि सहा.संचालक नगर रचना प्रशांत भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली जवळपास ४७ कर्मचाऱ्यांची दोन पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत.
यापैकी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर यांचे नेतृत्वाखालील पथकाने छत्रपती शाहू महाराज पुतळ्या पासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करुन के.एल.मलाबादे चौक या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली.
तसेच सहा संचालक नगररचना प्रशांत भोसले यांच्या नेतृत्त्वा
खालील पथकाने शिवतीर्थ पासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करुन अटलबिहारी वाजपेयी चौक या स्टेशन रोडवरील अतिक्रमण हटविले.
आजच्या या मोहिमेत एकुण २९ हातगाडे , १५ लोखंडी स्टॅंण्ड जप्त करण्यात आलेले आहे.
आजच्या मोहिमेमध्ये सहा आयुक्त केतन गुजर, विद्युत अभियंता संदीप जाधव, सहा. नगररचनाकार हरिश्चंद्र पाटील,
अमरजित लकडे, रचना सहायक नितिन देसाई, अविनाश बन्ने, प्रियांका बनसोडे, क्षेत्रीय अधिकारी दिपक खोत, प्रशांत आरगे यांचेसह महानगरपालिका कर विभागाकडील अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील तीनही पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच राहणार असुन यापुढे कोणतीही आगाऊ सूचना किंवा इशारा न देता अतिक्रमण हटविणेत येणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी शहरात रस्त्यांवर लागणारे चिकन बिर्याणी तसेच इतर सर्व हातगाडे यांचेवर सुद्धा कारवाई करणेत येणार आहे.
तरी सर्व संबंधितांनी यांची नोंद घ्यावी असे आवाहन महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636