सामाजिक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचा सहभाग
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : सुफी वारकरी विचार मंच,दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लि.,झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वतीने वारीमध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि औषध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक रविवार पेठ शाखा येथे १ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबीर पार पडले.दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लि.चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली मशकूर शेख,उमर शरीफ शेख,नितीन गोरावडे,रौफ कुरेशी,जमशेद बागवान,भरत चौधरी,इश्तियाक शेख,अखलाक कागदी,मुदस्सर जिनेरीं,मारुफ शेख,अश्फाक सय्यद इत्यादीनी संयोजन केले.
‘इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’(वानवडी)च्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले . दिनांक १ जुलै २०२४ रोजी हे शिबिर ७८- गुरुवार पेठ, नवयुग मित्र मंडळ, शीतळादेवी चौकाजवळ सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत पार पडले.या शिबिरात हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारीका, सहाय्यक वर्ग वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झाला . या उपक्रमाचे हे तेरावे वर्ष होते .
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636