युनानी मेडिकल कॉलेज आणि सामाजिक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : सुफी वारकरी विचार मंच,दि मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लि.,झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वतीने वारीमध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि औषध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक रविवार पेठ शाखा येथे १ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबीर सुरु रहाणार आहे.दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लि.चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार , मशकूर शेख , मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद. ( संचालक , रिकवरी कमिटी चेअरमन ) उमर शरीफ शेख,नितीन गोरावडे, रौफ कुरेशी, जमशेद बागवान,भरत चौधरी,इश्तियाक शेख,अखलाक कागदी,मुदस्सर जिनेरीं,मारुफ शेख ,अश्फाक सय्यद इत्यादी संयोजन करीत आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636