शिवाजी येडवान उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित
पुणे न्यूज एक्सप्रेस
रंगराव बन्ने / बारवाड
माणकापुर येथील निसर्गराजा ग्रुपचे अध्यक्ष दैनिक महासत्ताचे पत्रकार व निपाणी तालुका पत्रकार संघटनेचे सदस्य शिवाजी येडवान यांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सन २०२४ चा निपाणी तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रतिवर्षी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्याप्रमाणे चालू वर्षी शिवाजी येडवान यांची निपाणी तालुक्यातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. शिवाजी येडवान हे गेली १५ वर्षे पत्रकार म्हणून चांगल्या प्रकारे सेवा करत आहेत. त्याचबरोबर निसर्गराजा ग्रुपच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी कार्य करत आहेत. या कार्याबरोबर साहित्य क्षेत्रातही हिरीरीने सहभाग घेत असतात. याचीच दखल घेऊन त्यांना अतिग्रे येथे संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक- मा. मनोज साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक- मा. सुनील फुलारी, साहेब यांच्या हस्ते व संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे प्राचार्य- मा. विराट गिरी सर, असोसिएशनचे संस्थापक- सुधाकर निर्मळे, बी न्युजचे कार्यकारी संपादक- या मुल्लाणी यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अभिनेता व पत्रकार- दगडू माने, प्रा.रवींद्र पाटील, शाहीर संभाजी माने, रंगराव बन्ने, तानाजी बिरनाळे, योगेश माने, रामचंद्र रेवडे, देवदास सिसाळे, अमर येडवान, विठ्ठल काटकर यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : अतीग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार स्वीकारताना शिवाजी येडवान
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636