द जर्नालिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान.


मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर यांच्या वतीने पत्रकारांना वही व पेन वाटप.

पुणे न्यूज एक्सप्रेस :

अन्वरअली शेख

पिंपरी चिंचवड शहर : निगडी दि. ६ :- द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त निगडी येथील द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ यांच्या वतीने आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.

द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे यांच्या निगडी येथील मुख्य कार्यालयात पत्रकारांना पुष्प गुच्छ देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले.
६ जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे. लाखो वाचक वेबसाइट्स आणि युट्युब चैनलच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांचे आपल्या भागाचे, समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत.

पत्रकार दिनानिमित्त पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱे पत्रकार इम्रान सिराज शेख यांची द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर रजाक साहेबलाल शेख यांची मावळ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दोन्ही पत्रकारांना नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे यांच्या हस्ते देण्यात आले.

Advertisement

यावेळी मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष बाबू हिरमेठकर यांनी उपस्थित पत्रकारांना वही व पेन भेट देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी ह्युमन राईट्स फाॅर प्राॅटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा देताना म्हणाले आज समाजा मध्ये जे काही आम्ही काम करतो ते लोकांन पर्यंत पोहचविण्याचे काम हे पत्रकार बंधु करत असतात खर तर यांचे योगदानामुळे आमचे काम सर्वत्र पहुचत असतो पत्रकार हे खरे दर्पणकार आहेत असे मनोगत या वेळी एम डी चौधरी यांनी व्यक्त केले. या वेळी आरपीआय चे नेते अर्थ मुव्हर्स असोसिएशन चे अध्यक्ष श्रीमंत शिवशरण यांनी पत्रकार हे लोकशाहीचे चौथा स्तंभ आहे आपल्या माध्यमातून गोर गरीब व समाजामध्ये घडत असलेल्या सर्व बातम्या छापून सर्वाना न्याय देण्याचे काम अहोरात्र करत असतात मराठी पत्रकार दिनानिमित्त मी सर्वाना शुभेच्छा देतो पुढे असेच काम आपण सर्वानी करावा असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी, मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेठकर, द जस्ट आज वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे, विषेश तपास संपादक राजु इंगळे, पुणे खबर संपादक रजाक साहेबलाल शेख, दैनिक राज्य लोकतंत्र प्रतिनिधी इम्रान सिराज शेख, न्यूज एक्स्प्रेस 18 मुख्य संपादक श्रीनिवास माने, साप्ताहिक वास्तवता संपादक मिलिंद ज्ञानदेव शिंदे, न्यूज महाराष्ट्र k9 वृत्त वाहीनी पिंपरी चिंचवड सचिव गणेश पाटील, न्यूज महाराष्ट्र k9 वृत्त चे उपसंपादक रोहित रामदास ताटे, अर्थमुव्हर्स असोसिएशन पिंपरी चिंचवड आरपीआय चे अध्यक्ष श्रीमंत शिवशरण, मनसे मावळ उपाध्यक्ष मोजेस दास , ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे देहूरोड शहर अध्यक्ष रवींद्र चोपडे, संघटनेचे सदस्य सुशांत जोगदंड, इराणी अली पठाण, यल्लाप्पा सालूटगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्या वतीने संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे यांनी केले तर सुत्रसंचालन चंद्रशेखर पात्रे यांनी केले आभार प्रकट इम्रान शेख यांनी केले.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page