ग्रामीण भागातल्या तळागाळातील जनतेला मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्या शिवाय मानवी हक्क रुजणार नाही :- सरफराज़ पटेल
पुणे न्यूज एक्सप्रेस
उस्मानाबाद :
आज स्वआधार मतिमंद व मुक़बाधिर मुलींचे बालगृह उस्मानाबाद येथे ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन च्या वतीने मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला.
ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. तनवीरअहमद मुजावर,राष्ट्रीय मुख्य सचिव मा. हनीफ डफेदार आणि महाराष्ट्र राज्य सदस्य मा. सरफराज़ पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
स्वआधार मतिमंद व मुकबधिर मुलींना या वेळी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले व खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा चे औचित्य साधून उस्मानाबादचे नव नियुक्त अध्यक्ष मा. अरफ़ात शेरीकर यांचा सम्मान देखील या वेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सरफराज़ पटेल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. कलीम शेख, नंदकुमार मनाळे, खलील शेख, हनमंत पाटील व सय्यद साहेब इत्यादि उपस्थित होते.
या वेळी मानवाधिकार दिना निमित्त मार्गदर्शन करताना कार्यक्रमा चे अध्यक्ष मा. सरफराज़ पटेल यांनी सांगितले की,मानवी अधिकारात सर्वात मोठा अडथळा म्हणजे गरीबी, गरीबी दूर झाल्याशिवाय आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्याशिवाय मानवी हक्क तळागाळत रुजणार नाहीत. मानवाधिकार दिवस पाळला जातो, कारण की शोषित समाजातील लोकांना त्यांच्या मानवी हक्काची जाणीव व्हावी आणि त्यांचे जीवन सुयोग्य व्हावे. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीचा जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य, समानता आणि आदर हा मानवी हक्कांतर्गत येतो, परंतु बहुतेक लोकांना या अधिकारांची माहिती नसते. त्यांना या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी मानव अधिकार दिनाचे आयोजन करणे गरजेचे आहे.
बोलण्याचे स्वातंत्र, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा अधिकार, आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार, रंग, वंश, भाषा, धर्म या आधारावर समानतेचा अधिकार, कायद्यासमोर समानतेचा अधिकार, कायद्यासमोर आपली भूमिका मांडण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हे अधिकार आपल्याला प्रदान करण्यात आलेले आहेत. जर या अधिकारांवर गदा आणली जात असेल तर त्याविरोधात आपण आवाज उठवण्यासाठी एक चळवळ उभी कारणे अत्यंत आवश्यक आहे.या साठी आपण सर्वांना मी ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन मध्ये सामिल होण्या साठी आवाहन करीत आहे.
या वेळी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष मा. अरफ़ात शेरीकर म्हणाले की, मी ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन च्या माध्यमातून आदरणीय सरफराज़ पटेल यांच्या मार्गदर्शना खाली सार्वसामान्य लोकांच्या मुलभुत अधिकारांसाठी दिवस रात्र प्रयत्न करेन, त्यांना मानवाधिकारांच्या प्रती जागरूक करण्यासाठी एक उत्कृष्ट टीम स्थापन करुन माझी निवड सार्थ ठरवेन.
ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन कडून झालेल्या या अभिनव कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636