महाविकास आघाडीने मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही या संतप्त भावनेतून मी उमेदवार -अंजूम इनामदार
पुणे न्यूज एक्सप्रेस :
209 शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अंजुम इनामदार यांनी मतदार संघातील मस्जिद, मुस्लिम व इतर समाज बांधवांच्या घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन करीत आहे की महाविकास आघाडीने लोकसभेत 48 पैकी एकही मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला नाही तसेच विधान परिषद मध्ये ही मुस्लिमांना डावलण्यात आले. सध्याची विधानपरिषद पूर्णपणे मुस्लिम मुक्त आहे.
पुण्यातील मुस्लिमांना अपेक्षा होती की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात असलेल्या 21 विधानसभा मतदारसंघापैकी किमान एक तरी विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळेल. मुस्लिम समाजाला सत्तेत भागीदारी द्यावी याकरिता पुणे शहरातील मुस्लिम समाजाचे धर्मगुरूंचा शिष्ट मंडळ स्वतः खासदार शरद पवार यांना तीन वेळा भेटून विनंती केली. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटवले यांनाही भेटून निवेदन देण्यात आले व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही पत्र व्यवहार करून विनंती केली की ज्या समाजाला एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीचा पर्याय असताना सुद्धा त्यांना पूर्णपणे नाकारत महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने भरभरून मतदान दिले. मागच्या तुलनेत यावेळी महाविकास आघाडीचे जास्त खासदार लोकसभेत निवडून आले विशेष करून यावेळी मुस्लिम समाजाचे मतदानाची टक्केवारी ही वाढली होती. एकजूटीने मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिला. विधानसभा निवडणूक तिकीट वाटपच्या शेवटपर्यंत मुस्लिम समाजाला अपेक्षा होती की कमीत कमी एक तरी जागा जिल्ह्यात मुस्लिमांना मिळेल पण महाविकास आघाडीने मुस्लिमांना उमेदवारी न देता पुन्हा सिद्ध केलं की आम्हाला फक्त मुस्लिमांचे मतदान पाहिजे मात्र मुस्लिमांना सत्तेत भागीदारी मिळणार नाही.
महाविकास आघाडीने मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही या संतप्त भावनेतून अंजुम इनामदार 209 शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे त्यांच्या चुनाव चिन्ह रोड रोलर आहे. मतदारसंघातील सर्व मस्जिद इतर समाज बांधवांना प्रत्यक्ष भेटून महाविकास आघाडीने मुस्लिमांचा केलेला विश्वासघात बाबत चर्चा करीत आहे.
ते मतदारांना आवाहन करतात की समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात विधिमंडळामध्ये आवाज उचलण्यासाठी पुणे जिल्ह्यातून एकही मुस्लिम प्रतिनिधी नाही. गेल्या 40 वर्षांपूर्वी पुणे शहरातून फक्त एक आमदार अमीनुद्दीन पेनवाले साहेब निवडून आले होते त्यानंतर कधीही पुण्यात मुस्लिमांना संधी मिळाली नाही कृपया यावेळी आपण सर्वांनी बदल घडवूया आणि एक अपक्ष उमेदवार म्हणून मला विधानसभेत पाठवा महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त करीत मतदारांना आवाहन करीत आहे.
सध्याचे असलेले भाजप पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर असलेली मतदारांची नाराजी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्ता बहिरट व काँग्रेसचे मनीष आनंद एक बंडखोर उमेदवार व इतर 12 उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होऊन निवडून येतील अशी भावना अंजुम इनामदार यांनी व्यक्त केली.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
अंजुम इनामदार
9028402814
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636