बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन व वाहतूक केलेबाबत ग्रो इंडिया रेसिडेन्सी प्रा . लि यांना ९ कोटींचा दंड 


अपना वतन संघटनेचे ” गोट्या भेट ” आंदोलन स्थगित

पुणे न्यूज एक्सप्रेस :

अनवर अली शेख :

पिंपरी चिंचवड : एस के एफ कंपनीसमोर , सर्व्हे नं १६९/१ , याठिकाणी ग्रो इंडिया रेसिडेन्सी प्रा . लिमिटेड यांचेकडून , सोनिगरा द मार्क या प्रकल्पासाठी बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन व वाहतूक केलेबाबत गौणखनिज उत्खनन फोटो व गौणखनिज वाहतूक करतानाचे व्हिडीओ सोबत जोडून दिनांक २७/१२/२०२३ रोजी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष श्री , सिद्दीकभाई शेख यांनी मा. अप्पर तहसीलदार , पिंपरी चिचंवड यांच्याकडे तक्रार केलेली होती

Advertisement

सदर बाबत तहसीलदार कार्यालयाकडून दुर्लक्ष झाल्याने आज दिनांक ७/०८/२०२४ रोजी अपना वतन संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालय याठिकाणी गोट्या भेट आंदोलन करण्यात येणार होते . परंतु तहसीलदार जयराज देशमुख यांनी आंदोलनाची दखल घेत सकारत्मक चर्चा केली. यावेळी बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन व वाहतूक केलेबाबत ग्रो इंडिया रेसिडेन्सी प्रा . लि यांना ९ कोटींचा दंड केल्याचा आदेश काढला . तसेच मंडलाधिकारी व तलाठी यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नोटीस काढून खुलासा मागवण्यात येईल व बिल्डरांवर गुन्हा दाखल करणेबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांना दिले .

यावेळी गोट्या भेट आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे , सचिव दिलीप गायकवाड , महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा , नयूम पठाण , संघटक गणेश जगताप , तौफिक पठाण , किरण जगताप ,जमील शेख , संतोष सुतार , कुदरत खान यांच्यासहित अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page