महत्त्वाची सूचना : पवना धरण नदी पात्रात विसर्ग चालू
पुणे न्यूज एक्सप्रेस :
अनवर अली शेख :
पिंपरी चिंचवड : पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीत 93% भरलेले असून धरणाच्या सांडव्यावरून 3600 cusecs तर जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 cusecs असा *एकुण 5000 cusec* इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू आहे.
पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला असल्याने पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज सकाळी 10:00 वाजता सांडव्यावरून विसर्ग वाढवून 5670 cusec करण्यात येणार आहे.
तरी नदी पात्रामध्ये एकुण 7070 cusecs (5670 +1400 = 7070 cusec) इतक्या क्षमतेने विसर्ग होणार आहे. पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.
सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करावे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636