कोल्हापुरात एका सराईत गुंडासह दोघांचा खून.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-शहरात फुलेवाडी परिसरात सराईत गुंड ऋषीकेश रविंद्र नलवडे (वय 30 रा.लक्षतीर्थ वसाहत) याचा पाठलाग करून खून केला.ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली.काही वेळातच खासबाग परिसरात सतीश बाबूराव खोत (वय 58 रा.बालगोपाल तालीम नजीक) या वयोवृध्दाचा डोक्यात काठीने मारुन खून केल्याची दुसरी घटना घडली.
दिवाळीच्या सणातच खूनाची घटना घडल्याने पोलिसदल हादरले.लक्षतीर्थ येथे ऋषीकेच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी आक्रोश केल्याने तणाव निर्माण झाला होता.त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.हल्लेखोरांच्या शोधात पोलिसाची पथके रवाना झाली आहेत. तसेच खासबाग परिसरात शिवीगाळ केल्याने सतीश खोत यांचा डोक्यात काठीने मारुन खून केलेल्याचा पोलिस शोध घेत आहेत. खून केलेल्याची नावे चौकशीत उघड झाली आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636