बार्टी संस्थेचा चा निधी जेवणावळी व इतरत्र वर्ग करण्याच्या भूमिकेच्या निषेधार्थ…… धरणे आंदोलन.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे :बार्टी संस्थेच्या वतीने भीमा कोरेगाव शोर्य दिनानिम्मित जेवणावळी साठी निविदा काढली असून तेथील पायाभूत सुविधा देण्यासाठी विविध विभागा ना 14 कोटी रु. देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे समाजात प्रचंड रोष असून बार्टी चा निधी हा संशोधन, प्रशिक्षण व मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हितासाठी आहे. असे असताना 14 कोटी वर्ग करणे योग्य नाही, भीमा कोरेगाव शोर्य दिनासाठी सरकारने स्वतंत्र निधी दयावा किंवा जिल्हा नियोजन समिती तर्फे तेथील सुविधासाठी निधी देण्यात यावा.
या मागणीसाठी बुधवार दि. 20 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन येथे भीम आर्मी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
आपला दत्ता पोळ (प्रदेशाध्यक्ष भीम आर्मी ) बहुजन एकता मिशन 9518780857
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636